सार्वजनिक ठिकाणांवरील अवैध नमाजपठण थांबवण्यासाठी गुरुग्रामच्या हिंदूंप्रमाणे लढा देण्याची आवश्यकता ! – नीरज अत्री
हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या कार्यक्रमात ‘सार्वजनिक स्थळांवर नमाज का ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
मुंबई – पोलीस आणि प्रशासन राजकीय नेत्यांच्या इशार्यांवर चालतात, हे देशभरात गेली अनेक वर्षे आपण अनुभवत आहोत. सार्वजनिक ठिकाणी होणारे अवैध नमाजपठण हे देशभरातील सभ्यतेला आव्हान आहे. गुरुग्राममध्ये उघडपणे रस्त्यांवर चालू असलेल्या अवैध नमाजपठणाला तेथील हिंदु नागरिक, तसेच संघटना यांनी ज्या प्रकारे विरोध केला, तसा विरोध देशभरात सर्व ठिकाणी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विवेकानंद कार्य समितीचे अध्यक्ष श्री. नीरज अत्री यांनी केले.
देशात सर्व धर्मियांना त्यांच्या श्रद्धेप्रमाणे प्रार्थना करण्याचा अधिकार आहे; परंतु रस्त्यावर नमाजपठण करणे योग्य आहे का ? सध्या रस्ते, रेल्वेस्थानक, मेट्रोस्थानक, विमानतळ, तसेच क्रिकेटच्या मैदानातही नमाजपठण केले जाते. असे करण्यामागे धर्मांधांचा काय हेतू आहे ? हिंदूंचा विरोध असूनही सार्वजनिक नमाजपठणाचा आग्रह का धरला जातो ? या माध्यमातून भारतविरोधी कोणते नवीन षड्यंत्र तर रचले जात नाही ना ? अशा अनेक सूत्रांवर चर्चा करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १० नोव्हेंबर या दिवशी ‘सार्वजनिक स्थळांवर नमाज का ?’ या विषयावर ऑनलाईन चर्चा ‘हिन्दू राष्ट्र की’, या कार्यक्रमात ऑनलाईन’ विशेष संवाद आयोजित करण्यात आला होता. या विशेष संवादात ते बोलत होते. या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता गौरव गोयल आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनीही त्यांचे मत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. चैतन्य तागडे यांनी केले. या कार्यक्रमाचा लाभ ४ सहस्र ९०१ जणांनी घेतला.
नीरज अत्री पुढे म्हणाले, ‘‘नमाजपठण जर रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी करायचे असेल, तर मग मशिदी कशाला हव्यात ?’ वर्ष १९४७ मध्ये भारताची फाळणी झाल्यानंतर धर्मांधांनी ‘पाकिस्तान ही आमची ‘लेटेस्ट’ मागणी आहे, ‘लास्ट’ (अखेरची) मागणी नाही’, असे म्हटले होते. यावरून लक्षात येते की, पूर्ण भारत कह्यात येईपर्यंत धर्मांध शांत न रहाता विविध गोष्टींवर स्वत:चा हक्क सांगण्याचा प्रयत्न करतात. हिंदूंनी हे लक्षात घेतले पाहिजे, तरच ते धर्मांधांचा प्रतिकार करू शकतात. हिंदू सतर्क झाले नाहीत, तर ऋषिमुनींनी निर्माण केलेली भारताची उज्ज्वल परंपरा लुप्त होऊ शकते, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे. धर्मांधांच्या मानसिकतेचा हिंदु आणि मुसलमान महिला यांना कशा प्रकारे धोका आहे ? हे लक्षात घ्यायला हवे. ’’
अवैध नमाजपठण थांबवण्यासाठी न्यायालयीन मार्गाने लढा देण्याची आवश्यकता ! – अधिवक्ता गौरव गोयल
‘व्होट बँके’च्या राजकारणासाठी राज्यघटनेचे पालन न करता विशिष्ट समाजाला गेली ७० वर्षे या देशात सवलत दिली जात आहे. भारतीय राज्यघटनेनुसार ‘कुणालाही त्रास होईल’, अशी कृती करण्याचा अधिकार नाही; मात्र सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करून रस्त्याने जाणारे पादचारी, वाहनांतील प्रवासी या सर्वांना ताटकळत ठेवले जाते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणारे अवैध नमाजपठण थांबवण्यासाठी न्यायालयीन मार्गाने लढा देण्याची आवश्यकता आहे. अधिवक्त्यांनी यासंदर्भात याचिका प्रविष्ट करण्यास पुढाकार घेतला पाहिजे.
इस्लामी देशांतही सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणावर बंदी; तर धर्मनिरपेक्ष भारतात हे लाड का ? – नरेंद्र सुर्वे
सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्यासाठी मशिदींमध्ये जागा अल्प पडत असल्याचा तर्क सांगितला जात आहे; पण तो पूर्णत: चुकीचा आहे. जर त्याच प्रकारे हिंदूंनीही ‘पूजा-अर्चा, आरती आदी करण्यास मंदिरांत जागा अल्प असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी हे करतो’, असे सांगितले, तर ते चालेल का ? आज अनेक इस्लामी देशांत सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्यास बंदी आहे, तसेच असे कुणी केल्यास त्या व्यक्तींकडून मोठा दंड आकारला जातो. असे असतांना धर्मनिरपेक्ष भारतात सार्वजनिक ठिकाणी अवैध पद्धतीने नमाजपठण करण्यास पोलिसांकडून अनुमती का दिली जाते ? हिंदूंना मात्र सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यांसारख्या नियमित उत्सवांनाही अनुमती मिळवण्यास किती झगडावे लागते ! त्याच वेळी गुरुग्रामसारख्या आधुनिक शहरात पोलीस सुरक्षेत सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण केले जात होते, हे आश्चर्यजनक आहे. हिंदूंनी निषेध करून याविरोधात वैध मार्गाने लढा दिला पाहिजे.