बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कत्तलीपासून वाचवले ८ गोवंशियांचे प्राण !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होते. पोलीसप्रशासन कायद्याची प्रभावी कार्यवाही करणार का ?

वाचवलेल्या गोवंशासह बजरंग दल जिल्हाध्यक्ष सुरेश रोकडे

कोल्हापूर १४ नोव्हेंबर या दिवशी रात्री ८ वाजता एक गाडी शाहुवाडीतून देशी गाई घेऊन कत्तलीसाठी शाहूवाडी येथून घेऊन जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना समजली. ही माहिती समजताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सापळा लावून ६ गायी आणि २ वासरे यांना वाचवले. यातील दोन गायी या गरोदर होत्या. या गायी भुयेवाडी येथील ‘योगेश्वर गोशाळा’ येथे सोडण्यात आल्या आहेत. (जी गोष्ट बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना कळते ती गोष्ट सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पालिसांना का कळत नाही ? – संपादक)

या अभियानात बजरंग दल जिल्हाध्यक्ष सुरेश रोकडे, पन्हाळा तालुका गोरक्षा अध्यक्ष पवन उगळे, तालुकाप्रमुख विशाल परीट, कोडोली गोरक्षाप्रमुख प्रथमेश काईंगडे, कोडोली उपाध्यक्ष शिवराज मगदुम, प्रथमेश पाटील, लखन मेनकर, रामभाऊ बगले, विकी पाटील यांसह २५ कार्यकर्ते सहभागी झाले होते.