हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी करणारे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकावर बंदी घाला !

  • हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदन

  • हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित

राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवून अराजकाची स्थिती निर्माण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करा ! – संपादक 

कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात  १. तहसीलदार संतोष कणसे यांना निवेदन देतांना २.  संभाजीराव भोकरे, तसेच हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी करणारे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकावर बंदी घाला, तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवून अराजकाची स्थिती निर्माण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करा आणि त्यांना चिथावणी देणार्‍या रझा अकादमीवर बंदी घाला, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात १५ नोव्हेंबर या दिवशी ठिकठिकाणी प्रशासनास निवेदन देण्यात आले.

कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर एकत्र जमलेले हिंदुत्वनिष्ठ

१. कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार संतोष कणसे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिरोली येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. सतीश पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश यादव आणि श्री. राहुल नागटिळक,  युवासेना करवीर तालुकाप्रमुख श्री. संतोष चौगुले, शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री. अशोक पाटील, शिवसेनेचे श्री. दत्तात्रय विभुते, हिंदुत्वनिष्ठ श्री. उत्तम पाटील आणि श्री. अर्जुन चौगुले, उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, विपुल भोपळे, दीपक कातवरे, बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.

कागल येथे तहसीलदार शिल्पा ठोकडे (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

२. कागल येथे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. विजय आरेकर, श्री. सुशांत शिंदे आणि श्री. विजय शेटे कागल उपशहरप्रमुख श्री. प्रभाकर थोरात, बजरंग दलाचे श्री. विनायक आवळे, भारतीय किसान संघाचे श्री. दिलीप पाटील, गोसेवा समितीचे श्री. राजेंद्र भोजे, भाजपचे श्री. एकनाथ पाटील, रणदेवीवाडीचे ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रदीप खोत, रणदेवीवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. मच्छिंद्र संकपाळ, पिंपळगाव येथील गोसेवा समितीचे श्री. बाबासो कुट, उद्योजक श्री. प्रमोद आरेकर, धर्मप्रेमी श्री. अजय लोहार, श्री. रामचंद्र पाटील, श्री. विपुल महंतो, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर उपस्थित होते.

याचसमवेत समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना कागलतालुका यांच्या वतीने ‘त्रिपुरा येथील घटनेवरून महाराष्ट्रात दंगल घडवणार्‍यांची चौकशी करावी’, या मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदनही कागल तहसीलदारांना देण्यात आले.

हुपरी येथे वरिष्ठ लिपिक अश्विनी अडसुळे (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

३. हुपरी येथे वरिष्ठ लिपिक अश्विनी अडसुळे यांनी निवेदन स्वीकारले. या प्रसंगी धर्मप्रेमी श्री. नितीन काकडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. निखिल कांबळे, श्री. प्रमोद कुडाळकर आणि श्री. विजय मेथे, हुपरी येथील श्री सद्गुरु बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे श्री. रवींद्र गायकवाड, धर्मप्रेमी सर्वश्री प्रमोद देसाई, गणेश घोरपडे, सागर चव्हाण, अमित काकडे, अर्जुन घोरपडे, शिवसेनेचे श्री. उपशहरप्रमुख श्री. भरत मेथे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर उपस्थित होते.

आजरा येथे नायब तहसीलदार संजय कांबळे (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

४. आजरा येथे नायब तहसीलदार संजय कांबळे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ श्री. संजय पाटील, ‘सनातन प्रभात’च्या वाचक कु. शीतल पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंदराव साठे, श्री. शंकर पटेकर, कु. प्रवीण पाटील उपस्थित होते.

शाहूवाडीचे नायब तहसीलदार रवींद्र मोरे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

५. शाहुवाडीचे नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी श्री. चंद्रकांत मापसेकर, वैद्य संजय गांधी आणि श्री. सुधाकर मिरजकर उपस्थित होते.

६. पन्हाळा, राधानगरी, चंदगड, शिरोळ, हातकणंगले, भुदरगड, गगनबावडा येथे निवेदन ‘ऑनलाईन’ पाठवण्यात आले.

सांगली – वरील मागण्यांसाठी सांगली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात १५ नोव्हेंबर या दिवशी वरील निवेदन देण्यात आले.


सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांत निवेदन

१. सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे १६ नोव्हेंबर या दिवशी देण्यात आले.

धाराशिव येथील उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

२. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री भगवान श्रीनामे, संतोष पिंपळे, विश्व लांडगे आदी उपस्थित होते.

तुळजापूर येथील तहसीलदार सौदागर तांदळे यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

३. तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील तहसीलदार सौदागर तांदळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री उमेश कदम, अमित कदम, दीपक पलंगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.