सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

१. भावपूर्ण नामजप करण्याचे महत्त्व

‘प्रत्येक नामजपाला भावाची जोड द्यावी. मन आणि बुद्धी या दोन्ही स्तरांवर भावासहीत नामजप झाला, तर त्या नामजपाने चैतन्य मिळते. त्यामुळे गुणवृद्धीही होते.

२. नाम आणि योगमार्ग

प्रत्येक कर्माला नाम जोडले, तर तो कर्मयोग होतो. नामजप करणारे मन भावाच्या दृश्यात रमवले, तर तो भक्तीयोग आणि मन अन् बुद्धी नामासह चालू लागले की, ज्ञानयोग होतो.

३. प्रेमभाव कसा वाढवावा ?

प्रेमभाव वाढवण्याचा सर्वांत सरळ आणि सोपा उपाय म्हणजे सर्वप्रथम इतरांचा विचार करणे, उदा. प्रथम साधकांचा विचार यायला हवा. ‘त्यांना कसे साहाय्य करू शकतो ? त्यांना कसा आनंद देऊ शकतो ?’ प्रेमभावातून पुढे प्रीतीच्या टप्प्याला जाता येते.

४. ‘स्व’ गुरुचरणी अर्पण केल्याने प्रगती होते !

स्वतःचे, म्हणजेच ‘स्व’चे आयुष्य संपवून सर्व गुरुचरणी समर्पित करून केवळ दुसर्‍यांसाठी जगल्यास साधनेत प्रगती होते.

६. सनातन संस्थेची स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया, म्हणजेच ‘ध्यानधारणा’ !

सनातन संस्थेच्या अंतर्गत साधना करतांना ध्यानधारणेसाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने साधक स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी जे प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांची चालता-बोलता ध्यानधारणा होते.

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेला महामंत्र

‘परिपूर्ण सेवा’ हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेसाठी दिलेला महामंत्रच आहे.

८. देवाचे रागावणे

चूक झाल्यामुळे देव रागावत नाही; पण आपण जर त्यातून काही शिकलो नाही, तर तो रागावतो.’

(१८.१०.२०१९)