शिवोलीचा भावी आमदार कोण ? हे जनता ठरवणार ! – मायकल लोबो, कचरा व्यवस्थापनमंत्री
म्हापसा – शिवोलीचा भावी आमदार कोण ? हे जनता ठरवणार आहे. शिवोलीवासियांनी विद्यमान आमदार विनोद पालयेकर यांना पुन्हा शिवोली मतदारसंघातून निवडून आणण्याची हमी दिल्यास मी माझी पत्नी दिलायला लोबो यांची उमेदवारी मागे घेण्यास सिद्ध आहे, असा दावा कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांनी केला.
ते पुढे म्हणाले, ‘‘माजी केंद्रीय संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर हे गोव्याला सदोदित पुढे नेण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटले. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी मी कटीबद्ध आहे. वर्ष २०१२ मध्ये ख्रिस्त्यांनी धर्मभेद न बाळगता भाजपसाठी मतदान केले. यंदा हीच परिस्थिती राहिल्यास भाजपची संख्या निश्चितच २१ वर जाणार आहे.’’