मंत्री मायकल लोबो हे भाजपचेच, त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास ! – सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप
पणजी – कळंगुटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो हे भाजपसमवेतच आहेत आणि पक्षात अंतर्गत भांडण नाही; मात्र काहींमध्ये मतभेद आहेत. मला मंत्री मायकल लोबो यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. निवडणूक घोषित झाल्यानंतरच भाजप उमेदवारी घोषित करणार आहे. भाजपचे गोव्यातील निवडणुकीचे पक्षाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस हे स्थानिक पक्षांशी युती करण्यासाठी चर्चा करत आहेत’’, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केले.