चौकशीविना कुणालाही उत्तरदायी ठरवता येणार नाही !
राज्यातील दंगलसदृश्य परिस्थितीविषयी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची सावध प्रतिक्रिया !
नागपूर – नांदेड, अमरावती आणि मालेगाव येथे घडलेल्या घटनांच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. राज्याची परिस्थिती नियंत्रणात आहे. चौकशीनंतर ज्या गोष्टी पुढे येतील, त्यावरून पुढील निर्णय घेण्यात येईल. चौकशीविना कुणालाही उत्तरदायी ठरवता येणार नाही, अशी राज्यातील दंगलसदृश्य परिस्थितीविषयी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. (‘हिंदूंवर थेट आरोप आणि अल्पसंख्यांकांविषयी मात्र सावध भूमिका’, हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे धोरण लक्षात घ्या ! – संपादक)
१५ नोव्हेंबर या दिवशी नागपूर येथील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी रझा अकादमीवर बंदी घालण्याच्या मागणीविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नावर गृहमंत्र्यांनी वरील वक्तव्य केले.