वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कठोर दळणवळण बंदी लावू शकतो ! – देहली सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन
नवी देहली – वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कठोर दळणवळण बंदीचे पाऊल उचलण्याची सरकारची सिद्धता आहे, असे देहली सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. देहली आणि त्याच्या परिसरातील भागात वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी सरकारने ही माहिती न्यायालयात दिली.
“GNCTD is ready to take steps like complete lockdown to control local emissions,’ said #ArvindKejriwal Govt in an affidavit #DelhiGovt #AirPollution #DelhiPollution #DelhiAirPollution https://t.co/FzuShfwTl7
— Zee News English (@ZeeNewsEnglish) November 15, 2021
सरकारने पुढे म्हटले की, दळणवळण बंदीमुळे हवेच्या गुणवत्तेत फारसा फरक पडेल, असेही नाही. वायू प्रदूषणाच्या सूत्रावर व्यापक स्तरावर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.