११ व्या ते १६ व्या शतकांपर्यंत १० कोटी हिंदूंचा नरसंहार झाला ! – इतिहासकार कोनराड एल्स्ट

हा इतिहास हिंदूंपासून का लपवण्यात आला ?, याचे उत्तर आतापर्यंचे सर्वपक्षीय शासनकर्ते देतील का ? हा नरसंहार का आणि कुणी केला ?, हे आता तरी हिंदूंना सांगितले पाहिजे ! – संपादक

इतिहासकार कोनराड एल्स्ट

वाराणसी (उत्तरप्रदेश) – भारतावर वर्ष ६३६ पासून विदेशातून आक्रमणे चालू झाली होती; मात्र ११ व्या शतकापासून ते १६ व्या शतकापर्यंतच्या काळात भारतात अनुमाने १० कोटी हिंदूंचा नरसंहार करण्यात आला, अशी माहिती प्रसिद्ध इतिहासकार कोनराड एल्स्ट यांनी येथे आयोजित ‘संस्कृती संसदे’त दिली. ‘या नरसंहरातून संपूर्ण जगाने धडा घेतला पाहिजे’, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.