(म्हणे) ‘हिंदुत्व’ म्हणणे हे राजकारण !’ – काँग्रसेच्या माजी खासदार आणि अभिनेत्री रम्या
काँग्रेसवाल्यांना हिंदुत्वाची कावीळ झाल्यामुळे त्यांना याहून वेगळे काय वाटणार ? काँग्रेसचे आयुष्य मुसलमानांचे लांगूलचालन आणि हिंदुद्वेष यांतच गेले आहे आणि आता भविष्यात हिंदू काँग्रेसला राजकीयदृष्ट्या संपल्याविना रहाणार नाहीत ! – संपादक
बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदु धर्म म्हणणे हे राजकारण नसून ‘हिंदुत्व’ म्हणणे हे राजकारण आहे. हिंदु धर्म आणि हिंदुत्व हे भिन्न आहे. हिंदु धर्म म्हणजे सर्वसमावेशक आणि सर्वांविषयी प्रेम असणे. (रम्या असे विधान इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मांविषयी करू शकतील का ? – संपादक) याच्या विरुद्ध हिंदुत्व आहे. खर्या हिंदूंना हा भेद समजलेला नाही, असे विधान काँग्रेसच्या माजी खासदार आणि अभिनेत्री रम्या यांनी सामाजिक माध्यमांद्वारे केले.