शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक
पुणे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (वय ९९ वर्षे) हे वृद्धापकाळामुळे आणि न्यूमोनियाग्रस्त असल्याने काही दिवसांपासून येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. ‘सध्या ते अतीदक्षता विभागात आहेत. त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे’, अशी माहिती येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी दिली आहे.