श्री. श्रवण अग्रवाल यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या भेटीच्या वेळी आलेल्या अनुभूती
१. आश्रमात चाललेल्या यज्ञाच्या वेळी सुगंध येणे आणि यज्ञामुळे मन शांत झाल्याने आश्रमातील सात्त्विकता ग्रहण करता येणे
‘रामनाथी आश्रमात एक यज्ञ चालू असतांना मला सुगंधाची अनुभूती आली. यज्ञापूर्वी माझे मन थोडे विचलित झाले होते; पण यज्ञानंतर ते शांत झाले. त्यामुळे मला आश्रमातील सात्त्विकता ग्रहण करता आली.
२. ‘आश्रमातील सेवेकरी होऊन सेवा शिकावी आणि ती करावी’, असे वाटणे
अधिवेशनाचे ७ दिवस कसे गेले ते कळलेच नाही. आता मला वाटत आहे की, मी आश्रमातील एक सेवेकरी होऊन आश्रमात राहून सेवा शिकावी आणि ती करावी.’
– श्री. श्रवण अग्रवाल, कतरास गढ, जिल्हा धनबाद, झारखंड. (२७.६.२०१६)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |