(म्हणे) ‘इस्लामिक स्टेट आणि हिंदुत्व एकच आहेत’, असे मी म्हटले नाही, तर ‘दोन्ही एकसारखे आहेत’, असे म्हटले !
काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांचे हास्यास्पद स्पष्टीकरण
शब्दांचा खेळ करून सलमान खुर्शिद कुणालाही मूर्ख बनवू शकत नाहीत ! हिंदुत्वाची तुलना इस्लामिक स्टेटशीच करण्याचा हा प्रयत्न आहे. इस्लामिक स्टेट सारखे हिंदुत्व असते, तर सलमान खुर्शिद किंवा मुसलमान जिवंत राहिले असते का ? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे ! – संपादक
संभल (उत्तरप्रदेश) – ‘इस्लामिक स्टेट ही आतंकवादी संघटना आणि हिंदुत्व एकच आहेत’, असे मी माझ्या पुस्तकात म्हटलेले नाही, तर ‘दोन्ही एकसारखे आहेत’, अस मी म्हटले आहे. ‘इस्लामिक स्टेट आणि बोको हराम इस्लाम धर्माचा अपवापर करतात’, असेही मी म्हटले आहे; परंतु इस्लामच्या अनुयायांपैकी कुणीही यावर आक्षेप घेतला नाही. (जे सत्य आहे त्याला कोण कशाला आक्षेप घेईल ? मात्र या सत्याच्या समर्थनार्थसुद्धा मुसलमान संघटना आणि त्यांचे नेते पुढे आलेले नाहीत, हेही सलमान खुर्शिद यांनी सांगायला हवे ! – संपादक) मी त्यांच्या (मुसलमानांच्या) धार्मिक भावना दुखावत आहे, असे कुणीही म्हटले नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी येथे कल्की महोत्सवात स्पष्टीकरण दिले.
सलमान खुर्शिद यांनी त्यांच्या ‘सनराइज ओव्हर अयोध्या’ या नव्या पुस्तकात ‘हिंदुत्व आणि इस्लामिक स्टेट अन् बोको हराम या आतंकवादी संघटना एकच आहेत’, असे म्हटले होते. त्यावरून त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका झाल्यानंतर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.
Salman Khurshid backtracks on Hindutva; says ‘Not same as ISIS, but similar’ amid backlash https://t.co/sMHTboMMEA
— Republic (@republic) November 14, 2021
खुर्शिद पुढे म्हणाले की,
१. काही लोक हिंदु धर्माला अपकीर्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. (काही लोक इस्लामला अपकीर्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याविषयी सलमान खुर्शिद यांना कधी पुस्तक लिहावेसे का वाटले नाही ? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे ! – संपादक)
२. असे लोक हिंदु धर्माचे शत्रू आहेत आणि त्यांना भीती वाटते की, त्यांचे सत्य समोर येईल. त्यांचे सत्य उघड करणार्या कोणत्याही पुस्तकावर ते बंदी घालतील. (सॅटनिक व्हर्सेस (सैतानाची आयते) पुस्तकातून इस्लामचे खरे सत्य समोर आल्यामुळे त्यावर भारतातील मुसलमानांनी तत्कालीन काँग्रेसकडे बंदी घालण्याची मागणी केली आणि काँग्रेसने बंदी घातली, असे समजायचे का ? – संपादक)
३. जर मला कोणत्याही धर्मापासून अडचण असती, तर मी येथे आलो नसतो. माझा विश्वास आहे की, हिंदु धर्म जगात शांततेचा प्रसार करतो. (‘इस्लाम म्हणजे शांती’ असा अर्थ सांगितला जात असतांना असा विश्वास ते इस्लामविषयी ठामपणे का दाखवत नाहीत ? – संपादक)