गाय, गायीचे शेण आणि गोमूत्र यांमुळे अर्थव्यवस्था सक्षम करू शकतो ! – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह
एकेका राज्याने यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा केंद्र सरकारने यासाठी संपूर्ण देशामध्ये प्रयत्न करावेत, असेच गोप्रेमींना वाटते ! – संपादक
भोपाळ (मध्यप्रदेश) – गाय, गायीचे शेण आणि गोमूत्र यांपासून आपण आपल्या अर्थव्यवस्था सक्षम करू शकतो. आपल्याला ते करावे लागेल. आज नाही, तर उद्या आपल्याला यश मिळणार हे निश्चित आहे. गोमूत्रापासून खत, किटकनाशक, औषधे आदी अनेक गोष्टी सिद्ध (तयार) करता येतात. सध्या आम्ही मध्यप्रदेशमधील स्मशानभूमींमध्ये ‘लाकूड जाळले जाऊ नये’ यासाठी प्रयत्न करत आहोत, अशी माहिती मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ‘इंडियन व्हेटरनरी असोसिएशन’च्या महिला विभागाच्या संमेलनात दिली.
शिवराज सिंह पुढे म्हणाले की, गाय आणि बैल यांच्याविना काम होऊ शकत नाही. सरकारने यासाठी गोशाळा आणि अभयारण्ये सिद्ध केली; मात्र जोपर्यंत लोक यात सहभागी होत नाही तोपर्यंत केवळ गोशाळा निर्माण करून यश मिळणार नाही. आम्ही मध्यप्रदेशमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत.
#MadhyaPradesh CM #ShivrajSinghChouhan also urged veterinary doctors & experts to engage in result-oriented work on how cow rearing could be profitable for small farmershttps://t.co/HlQXAKxxrl
— DNA (@dna) November 14, 2021