राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १४ नोव्हेंबर २०२१

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !


कुपोषित मुलांच्या माहितीसाठी ‘माहितीच्या अधिकारा’खाली प्रश्न विचारला नसता, तर सरकारने माहिती उघड केली असती का ? हे सरकारला लज्जास्पद !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘देशात ३३ लाखांहून अधिक बालके कुपोषित आहेत. त्यांपैकी निम्म्याहून अधिक बालके तीव्र कुपोषित श्रेणीत आहेत, अशी माहिती केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.’

भारतात ३३ लाखांहून अधिक बालके कुपोषित ठेवणे, ही स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत भारताने केलेली प्रगती म्हणायची का ? देशातील बालकांना कुपोषित ठेवणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

महंमद ओवैस याच्याकडून उपचारांच्या नावाखाली ८ वर्षे लोकांची दिशाभूल होत असतांना आता जागे झालेले पोलीस !

सौजन्य : मनोरमा न्युज / हिंदू पोस्ट

‘कन्नूर (केरळ) जिल्ह्यामध्ये उपचारांच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणार्‍या महंमद ओवैस याला पोलिसांनी नुकतीच अटक केली. ओवैस रुग्णांना कुराणामधील ‘आयते’ (कुराणातील वाक्ये) म्हणत पाणी देत होता. तो लोकांना भीती दाखवायचा की, डॉक्टर ‘सैतान’ आहेत आणि रुग्णालय ‘नरक’ आहे. तुमचा रुग्णालयात मृत्यू आला, तर तुम्हाला ‘जन्नत’ (स्वर्ग) मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही उपचारांसाठी रुग्णालयामध्ये जाऊ नका. हा प्रकार गेल्या ८ वर्षांपासून चालू होता. रुग्णांना डॉक्टरांकडे जाण्यापासून परावृत्त केल्याने अनेकांचा मृत्यूही झाला.’