राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : १४ नोव्हेंबर २०२१
खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत.
(म्हणे) ‘सनातन संस्थेचाही गुन्हेगारी जगताशी संबंध जोडायचा का ?’
देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांचा प्रश्न !
‘मी कुठलीही भूमी कुणाच्याही दबावाखाली किंवा कुणावर दबाव आणून घेतलेली नाही. हसीना पारकर हिलाही मी ओळखत नाही. असा कुणाचाही कुणाशी संबंध जोडायचा झाला, तर दाऊद कासकरचे कोकणातले घर सनातन संस्थेने घेतले आहे; मग ‘सनातनचा दाऊदशी किंवा गुन्हेगारी जगताशी (अंडरवर्ल्डशी) संबंध आहे’, असे म्हणायचे का?,’ असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर उत्तर देतांना केला. देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांनी गुन्हेगारी जगताशी संबंध असलेल्यांकडून अल्पदरात भूमी घेतल्याचा आरोप केला आहे. त्यावर मलिक यांनी वरील भूमिका मांडली.’
आतंकवादी दाऊद याची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही ! – सनातन संस्था
‘मुंबईतील अमली पदार्थाच्या प्रकरणात अत्यंत हीन पातळीचे राजकारण चालू आहे. त्यातच नवाब मलिक यांनी स्वतःवर झालेल्या आरोपांच्या खुलाशासाठी सत्य जाणून न घेताच सनातन संस्थेच्या नावाचा विनाकारण वापर केला आहे. कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम याची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही. प्रत्यक्षात रत्नागिरीतील वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार ती मालमत्ता देहलीतील अधिवक्ता अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केली आहे. त्या ठिकाणी लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी ‘सनातन धर्म पाठशाळा’ नावाने गुरुकुल चालू करण्याचे त्यांनी घोषित केले आहे. सनातन संस्था आणि अधिवक्ता अजय श्रीवास्तव यांचा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.’