नांदेड येथे हिंसाचार करणार्‍यांना तात्काळ अटक करा !

विश्व हिंदु परिषदेच्या वतीने मागणी

नांदेड, १३ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘नांदेड बंद’च्या नावाखाली हिंदु व्यापारी, जनता, तसेच पोलीस आणि पत्रकार यांवर आक्रमणे करणार्‍या भ्याड आक्रमणकर्त्यांवर तात्काळ अटकेची कारवाई करावी, अशी मागणी येथील विश्व हिंदु परिषदेच्या वतीने १३ नोव्हेंबर या दिवशी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ‘अशांतीप्रिय’ लोकांनी शहरात उन्माद मांडला.  सहस्रोंच्या संख्येने गर्दी करत मोर्चा कुणाच्या पाठिंब्याने काढण्यात आला ? मोर्च्याचे आयोजक, तसेच इतर दोषी यांच्यावर लवकर कारवाई करावी, आक्रमणकर्त्यांवर कारवाई न झाल्यास विहिंप,बजरंग दल सर्व हिंदु संघटनांना घेऊन तीव्र आंदोलन छेडेल, याची नोंद प्रशासनाने घ्यावी.