विविध त्रासांवर नामजपादी उपाय अचूक शोधून ते केल्याने त्रास दूर होणे आणि यावरून लक्षात येणारे उपायांचे महत्त्व
‘नामजपादी उपाय केल्याने साधकांचे त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला
‘मनुष्याच्या जीवनात येणार्या ८० टक्के समस्या या आध्यात्मिक कारणांमुळे आलेल्या असतात. त्यामुळे अशा समस्या सुटण्यासाठी साधना करण्याची आवश्यकता असते. साधनेच्याच जोडीला समस्यांच्या त्या त्या प्रसंगांच्या वेळी त्या त्या समस्येवर नामजपादी आध्यात्मिक उपाय शोधून ते करण्याचीही आवश्यकता असते. सध्या धर्माचरणाचा र्हास झाल्याने आलेल्या आपत्काळामध्ये वाईट शक्तींचा प्रकोप झाला आहे. त्यामुळे त्यांनी सत्कार्यामध्ये विघ्ने आणून त्रास देण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी समाजाभिमुख सत्कार्य करणार्या, म्हणजे समष्टी साधना करणार्या सनातनच्या साधकांना सध्या अशा त्रासांची प्रचीती वारंवार येत आहे. त्यामुळे कोणतेही सत्कार्य निर्विघ्नपणे होण्यासाठी आधीच नामजपादी उपाय शोधून ते करावे लागत आहेत. तसेच आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रतिदिन करत असलेल्या व्यष्टी साधनेमध्येही साधकांना वाईट शक्ती वारंवार त्रास देत आहेत. त्यासाठीही साधकांना नामजपादी उपाय शोधून ते करावे लागत आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे लाभलेले मार्गदर्शन आणि कृपा यांमुळे मी साधकांना होत असलेल्या आणि त्यांच्या सेवेत येत असलेल्या आध्यात्मिक त्रासांवर नामजपादी उपाय शोधण्याची अन् ते काही प्रसंगी करण्याची सेवा गेली काही वर्षे करत आहे. तसेच साधकांच्या वस्तू, रहाण्याच्या वास्तू, देवतांची चित्रे इत्यादींवर होत असलेल्या वाईट शक्तींच्या आक्रमणांवरही नामजपादी उपाय करू शकत आहे. वाईट शक्तींच्या त्रासांवर नामजपादी उपाय करणे म्हणजे त्यांच्याशी एक प्रकारे लढणेच असते. पाचव्या, सहाव्या पाताळांतील वाईट शक्तींची शक्ती पुष्कळ असल्याने त्यांच्याशी लढणे, म्हणजे आपल्या जिवावर बेतण्याएवढे धोकादायक असते, तरीही गुरूंचे संरक्षककवच आणि देवाची कृपा यांमुळेच मी ही सेवा करू शकत आहे. या सेवेतील माझे विविध अनुभव, मला शिकायला मिळालेली सूत्रे, मी नामजपादी उपाय केलेल्या साधकांच्या अनुभूती इत्यादी लिखाण या लेखमालेत देत आहे. ‘हे लिखाण वाचून साधना, नामजपादी उपाय आणि गुरुकृपा यांचे जीवनातील महत्त्व सर्वांच्या मनावर बिंबो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना करतो.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.८.२०२१)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/525133.html
‘ऑनलाईन’ नवम अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशनाच्या कालावधीत सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले आणि अडचणी दूर होण्यासाठी विविध संतांनी केलेले उपाय अन् त्यांमुळे झालेले परिणाम
‘हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ३०.७.२०२० ते २.८.२०२० आणि ६ ते १०.८.२०२० या कालावधीत ‘नवम अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशना’चे ‘ऑनलाईन’ आयोजन करण्यात आले होते. आयोजनाच्या सेवेत विविध स्तरांवर अडथळे येत असल्याचे लक्षात आले. अडथळ्यांमध्ये प्रक्षेपणातील तांत्रिक समस्या, वक्त्यांना जोडण्यात अडचणी येणे, अधिवेशनासाठी आवश्यक असणारी ध्वनीचित्रचकती ‘अपलोड’ न होणे आदींचा समावेश होता. या मागे आध्यात्मिक कारण असल्यास त्याच्या निवारणार्थ सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारले. त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय परिणामकारक असल्याने अधिवेशनात येणार्या विविध अडथळ्यांवर मात करता आली. हे नामजपादी उपाय पू. उमेश शेणै, पू. शिवाजी वटकर, पू. गुरुनाथ दाभोेलकर आणि पू. (कै.) सदाशिव सामंत या संतांनी केले. त्या संदर्भातील वृत्तांत येथे दिला आहे.
२. ३०.७.२०२० (प्रथम दिन)
२ अ. जप : महाशून्य
२ आ. मुद्रा : नामजपादी उपाय करणार्या साधकाने त्याचा तळहात आज्ञाचक्रासमोर १ – २ सें.मी. अंतरावर आडवा धरावा आणि ‘महाशून्य’ हा जप करावा.
२ इ. कालावधी : १ घंटा
३. ३१.७.२०२० (द्वितीय दिन)
३ अ. जप : शून्य
३ आ. मुद्रा : नामजपादी उपाय करणार्या साधकाने त्याचा तळहात तोंडासमोर १ – २ सें.मी. अंतरावर आडवा धरावा आणि ‘शून्य’ हा नामजप करावा.
३ इ. कालावधी : २ घंटे
३ ई. प्रार्थना : नामजपादी उपाय करणार्या साधकाने ‘हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडू दे’, अशी श्रीकृष्णाला प्रार्थना करावी.’
(क्रमश:)
– श्री. अरुण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.८.२०२०)
परात्पर गुरुदेवांच्या कृपेने आम्हा साधकांना नामजपादी उपायांचे महत्त्व शिकायला मिळत आहे, यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी अल्पच आहे. |
|