शासनाने सुरक्षेची निश्चिती दिल्याने खासगी बसची एस्.टी. स्थानकातून वाहतूक चालू !
पुणे – एस्.टी. कर्मचार्यांच्या संपामुळे होणारी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहतूकदारांना एस्.टी. स्थानकातून प्रवासी वाहतुकीची अनुमती दिली होती; मात्र खासगी वाहनावर दगडफेक करणे, चालकाला मारहाण करणे आदी घटना घडल्या. तसेच एस्.टी.चे अधिकारी, स्थानिक पोलीस सहकार्य करत नसल्याने सुरक्षा मिळेपर्यंत खासगी वाहतूकदारांनी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परिवहनमंत्री अनिल परब यांनी सुरक्षेची निश्चिती दिल्यानंतर ही वाहतूक पुन्हा चालू केली असल्याची माहिती राज्य प्रवासी मालवाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली. राज्यभरात अनुमाने २ सहस्र खासगी बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक चालू आहे.