मोर्च्यांच्या नावाखाली महाराष्ट्रात दहशत निर्माण करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी ! – राष्ट्रीय वारकरी परिषद
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – मुसलमान समाजाने मोर्च्यांच्या नावाखाली एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे सामाजिक माध्यमांतून प्रसारित होणार्या ‘व्हिडिओ’मध्ये दिसत आहे. अनेक ठिकाणी दगडफेक करून दुकाने आणि वाहने यांची तोडफोड करण्यात आली. अशा हिंसाचारी धर्मांधांना त्वरित अटक करून सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,
१. मागील अनेक वर्षांपासून धर्मांधांनी अशाच प्रकारे काश्मीर येथे दहशत निर्माण करून हिंदूंना पलायन करण्याची स्थिती निर्माण केली. तसेच देशात हिंदू अल्पसंख्य असलेल्या प्रत्येक भागात हीच परिस्थिती निर्माण होत आहे. महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती निर्माण करण्यासाठी हा एक प्रकारे प्रारंभ असून दहशत निर्माण करण्याचाच भाग आहे.
२. मोर्चे काढणे, निवेदने देणे हा लोकशाहीत बाजू मांडण्याचा अधिकार आहे; मात्र त्या नावाखाली कायदा मोडून हिंसाचार केला जातो. हिंदूंवर आक्रमण करणे, त्यांची वाहने आणि दुकाने यांची तोडफोड करणे या गोष्टी जाणीवपूर्वक हिंदूंना भयभीत करण्यासाठी होत आहेत. जगातील हिंदूंचा निर्वंश होऊ नये, यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करणार्या संघटनांच्या पाठीशी हिंदु समाजाने उभे रहावे.