मे २०२१ मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ्. इन्स्टाग्राम’ आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.लाइव्ह चॅट’ या माध्यमांतून जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

१. एस्.एस्.आर्.एफ्. इन्स्टाग्राम

‘तुम्ही दिवसातून २ वेळा अग्निहोत्र करायला सांगितले आहे. त्यानुसार मी तुमच्या संकेतस्थळावरून ध्वनीमुद्रित केलेला संबंधित मंत्रजप घेतला आहे आणि तो मी प्रतिदिन लावतो. त्यामुळे आता घरात वाईट शक्तींचे अस्तित्व जाणवत नाही. मी अग्निहोत्र करू लागल्याच्या अगदी दुसर्‍या दिवसापासून माझे मद्यपानाचे व्यसन पूर्णतः नाहीसे झाले. तेव्हापासून मी लोकांना ‘कोणत्याही व्यसनातून मुक्त व्हायचे असल्यास अग्निहोत्र करा’, असे सुचवतो.’ – श्री. निक रॉबर्ट्स

२. एस्.एस्.आर्.एफ्. लाइव्ह चॅट

मी माझ्या मित्रांना ‘एस्.एस्.आर्.एफ्. यू ट्यूब’ वाहिनीमुळे होणारे लाभ सांगतो. अनेक लोक देवाच्या शोधात आहेत. त्यांना अध्यात्मात प्रगती करण्यासाठी ‘एस्.एस्.आर्.एफ्. यू ट्यूब’ वाहिनी पुष्कळ साहाय्यभूत ठरेल. एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने घेण्यात येणार्‍या सत्संगांना मी उपस्थित रहात आहे. सत्संग घेणार्‍या साधकांतील नेतृत्व पाहून आणि त्यांचे बोलणे ऐकून मला चांगले वाटले. तुमच्या प्रेमळ शब्दांमुळेच मी आनंद अनुभवत आहे. ‘एस्.एस्.आर्.एफ्.यू ट्यूब’ वाहिनीमुळे मला पुष्कळ माहिती मिळत असून तुमच्या गुरूंकडून (सद्गुरु सिरियाक वाले आणि पू. रेन्डी इकारांतियो हे ‘नामजप सत्रे (ग्रुप चँटिंग सेशन्स)’ घेतात.) बरेच शिकायला मिळत आहे.’ – श्री. ल्यूक मॅकमन, युनायटेड किंगडम्

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक