रेल्वे सेवा पूर्ववत् होऊन कोरोना काळात ३० टक्के वाढलेले तिकीटदर अल्प होणार
नवी देहली – रेल्वे मंत्रालयाने आता रेल्वे गाड्या जुन्या क्रमांकांवरून आणि जुन्या तिकीटदरावर धावतील, अशी घोषणा केली आहे. मंत्रालयाने आता विशेष क्रमांकाद्वारे धावणार्या रेल्वे गाड्यांना नियमित रेल्वे क्रमांक देण्याचा आदेश दिला आहे. कोरोना काळात चालू झालेल्या गाड्यांच्या विशेष दर्जामुळे प्रवाशांना अधिक भाडे मोजावे लागत होते. या निर्णयामुळे कोरोना काळात वाढवलेले ३० टक्के भाडे आता अल्प होणार आहेत.
Indian Railways announces to cut ‘special train’ services; to return to pre-pandemic fares https://t.co/cnaBCGahuA
— Republic (@republic) November 12, 2021