देहलीतील सरकारी आणि खासगी कार्यालयांनी वाहनांचा वापर ३० टक्के न्यून करावा ! – केंद्रीय प्रदूषण मंडळाचा सल्ला

देहलीतील वाढते वायूप्रदूषण

नवी देहली – देहलीत वायूप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्याने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देहलीतील सरकारी आणि खासगी कार्यालयांना त्यांच्या वाहनांचा वापर किमान ३० टक्क्यांनी न्यून करण्याचा सल्ला दिला आहे.

देहलीमध्ये दिवाळीपासूनच वायू आणि पाणी यांच्या प्रदूषणाची पातळी वाढत आहे. येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ५०० च्या पुढे, म्हणजे धोकादायक पातळीवर आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि देहली सरकार यांच्याकडून सातत्याने प्रदूषणावर उपाययोजना काढण्यासाठी पावले उचलली जात आहेत; मात्र आतापर्यंत हे प्रयत्न अपुरे ठरले आहेत. त्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.