चित्रपटांतील मुसलमानांची दाखवण्यात येणारी नकारात्मक प्रतिमा पालटण्याचा अमेरिकेतील एका गटाचा प्रयत्न
|
नवी देहली – चित्रपटांमधून मुसलमानांची प्रतिमा नकारात्मक दाखवली जात आहे. ही प्रतिमा सुधारण्यासाठी अमेरिकेतील ‘पिलर्स’ नावाचा एक गट वॉल्ट डिज्नी आस्थापनासमवेत काम करून एक योजना बनवत आहे. या गटाने यापूर्वी चित्रपटांतून मुसलमानांची नकारात्मक प्रतिमा दाखवला जात असल्याविषयीचा एक अहवाल बनवला होता. या संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष काशिफ शेख यांनी सांगितले की, आम्ही मुसलमान कलाकारांची माहिती गोळा करत आहोत. त्यात अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार आदींचा समावेश आहे. त्यांना चित्रपट उद्योगात काम करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
A new initiative to promote the inclusion of Muslims in filmmaking has been created by an advocacy group with the support of the Walt Disney Co.
Read this story from @nytimes on WIONhttps://t.co/H219b3jHJc
— WION (@WIONews) November 10, 2021
अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे २०१७ आणि २०१९ या वर्षांत प्रसारित झालेल्या चित्रपटांच्या आधारे एक अहवाल बनवण्यात आला होता. या चित्रपटांत ३९ टक्के मुसलमान पात्रांना हिंसाचार करतांना दाखवण्यात आले होते. वाईट भूमिका असणार्या पात्रांपैकी ७५ पात्रांना इस्लामी कपडे घातलेले दाखवण्यात आले होते.