हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा गोव्यात १७ नोव्हेंबर या दिवशी ‘डोंगरी टू नोवेअर’ हा कार्यक्रम
हिंदुत्वनिष्ठ कार्यक्रम रहित होण्यासाठी प्रयत्न करणार
देशाच्या गृहमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका करणार्या आणि ३७ दिवस कारागृहात रहाणार्या अशा व्यक्तींच्या कार्यक्रमांवर गोवा शासनाने बंदी घालावी, ही अपेक्षा ! – संपादक
पणजी, १२ नोव्हेंबर (वार्ता.) सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारा गुजरात येथील स्वयंघोषित विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा ‘डोंगरी टू नोवेअर’ हा कार्यक्रम गोव्यात १७ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता ‘एल्.व्ही.सी. कॉमेडी क्लब’ येथे होणार आहे. या कार्यक्रमाची तिकिटे ‘बूक माय शो’वर विक्रीस उपलब्ध आहेत.
स्वयंघोषित विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांची हिंदुद्वेषी आणि आक्षेपार्ह वक्तव्याची पार्श्वभूमी आहे. त्यांनी जानेवारी २०२१ मध्ये इंदौर (मध्यप्रदेश) येथील ‘मुनरो कॅफेम’मधील एका कार्यक्रमात हिंदु देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह टिपण्या केल्या होत्या. या वेळी त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले होते आणि ते ३७ दिवस कारागृहात होते. कार्यक्रमाची रितसर अनुमती न घेणे, कोरोना काळात नियम न पाळणे, हिंदूंच्या देवतांवर अत्यंत आक्षेपार्ह टीका करणे यांमुळे सत्र आणि उच्च न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. त्यांनी यापूर्वीही ‘सी.ए.ए.’ कायदा, ‘गोध्रा हत्याकांडातील कारसेवकांचा मृत्यू’ आदींविषयीही आक्षेपार्ह वक्तव्ये केलेली आहेत. त्यांच्या अनेक आक्षेपार्ह वक्तव्यांची माहिती आणि व्हिडिओ आजही ‘यू-ट्यूब’वर उपलब्ध आहे.