हिंदुत्वाची तुलना आतंकवाद्यांशी करणारे हिंदुद्वेष्टे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या प्रतिकृतीचे सांखळी येथे ‘वन्दे मातरम्’ गटाने केले दहन
सांखळी, १२ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदुत्वाची तुलना आतंकवाद्यांशी करणारे हिंदुद्वेष्टे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांच्या प्रतिकृतीचे सांखळी येथे ‘वन्दे मातरम्’ या गटाने ११ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी दहन केले. नेते सलमान खुर्शिद यांनी ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या नवीन पुस्तकामध्ये हिंदुत्वाची तुलना ‘इस्लामिक स्टेट’ आणि ‘बोको हराम’ या जिहादी आतंकवादी संघटनांशी केली आहे. ‘आक्रमक हिंदुत्व हे इस्लामिक स्टेट आणि बोको हराम यांसारखे आहे’, असा आरोप त्यांनी या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक १० नोव्हेंबर या दिवशी प्रकाशित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर नेते सलमान खुर्शिद यांचा निषेध करण्यासाठी सांखळी येथे त्यांच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले.