संभाजीनगर येथील माजी नगरसेवक सय्यद मतीन यांच्या भावाच्या वाहनात नशेच्या २६० गोळ्या सापडल्या !
सय्यद मंजूर याला अटक !
स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! – संपादक
संभाजीनगर – चारचाकीतून नशेच्या गोळ्या घेऊन जाणार्या एका तरुणाला सिटी चौक पोलिसांनी रंगेहात पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून १३ ‘स्ट्रीप’मध्ये नशेच्या २६० गोळ्या जप्त केल्या आहेत. ११ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजता ही कारवाई करण्यात आली. सय्यद मंजूर असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी मंजूर याच्याकडे असलेले चारचाकी वाहन हे माजी नगरसेवक सय्यद मतीन यांचे भाऊ सय्यद मोसीन यांचे आहे. आरोपी मंजूरकडे त्यांची गाडी कशी आली ? नशेच्या गोळ्यांसाठी त्याने ती का वापरली ? कुणाच्या सांगण्यावरून वापरली ? यात आणखी कुणाचा सहभाग आहे का ?, याचे अन्वेषण पोलीस करत आहेत.