पारधीगुडा (जिल्हा चंद्रपूर) येथे सुतळी बॉम्बच्या स्फोटात ६ जण घायाळ !

लोकहो, फटाक्यांचे दुष्परिणाम जाणून आतातरी फटाके उडवू नका ! – संपादक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

चंद्रपूर – जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील पारधीगुडा येथे सुतळी बॉम्बच्या स्फोटात ६ जण घायाळ झाल्याची घटना १० नोव्हेंबर या दिवशी घडली. यामध्ये ३ जण गंभीर, तर ३ जण किरकोळ घायाळ झाले आहेत. नेताजी शेरकुरे यांनी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ४ सुतळी बॉम्ब आणले होते. त्यातून १ सुतळी बॉम्ब काढून त्याने लगतच फोडला. त्याची ठिणगी उडून पिशवीमधील बाकीचे सुतळी बॉम्ब एकाच वेळी फुटायला लागले.

यात तेथील रमेश पवार, धनराज शेरकुरे आणि अनिल शेरकुरे यांच्या हाता-पायांना गंभीर इजा झाली, तर उमेश काळे, रमेश शेरकुरे आणि लहू काळे (सर्व रा. पारधीगुडा) हे किरकोळ घायाळ झाले. ग्रामस्थांनी त्यांना त्वरित ग्रामीण रुग्णालयात भरती केले.