मंदिरापासून ११४ मीटर अंतरावर असलेला बिअर बार हटवण्याचा आदेश देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार !
हिंदु राष्ट्रात मद्यावर बंदी असेल, त्यामुळे असे प्रश्नच निर्माण होणार नाहीत !
‘सर्वाेच्च न्यायालयाने पुद्दुचेरी येथील थ्रोबथियाम्मम् मंदिराच्या जवळ असलेला बिअर बार बंद करण्याचा आदेश देण्यास नकार दिला. न्यायालयाने म्हटले की, मंदिराच्या जागेपासून काही अंतरावर ‘जोठी’ नावाचा बिअर बार आहे. त्यामुळे तो बंद करण्याचा आदेश देण्याला कोणताही आधार नाही. मंदिर आणि बिअर बार यांच्यातील अंतर ११४.५ मीटर इतके आहे, म्हणजे १०० मीटरपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तो बंद करण्याचा आदेश देता येत नाही. काही जणांना पूजा करायची असेल, तर काही जणांना मद्य प्यायचे असू शकते.’