पेनने लिहिण्यात अनिष्ट शक्तींनी आणलेले अडथळे
‘२६.७.२०२० या रात्री श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यांच्याकडील ‘गुलाबी रंगाचे पेन (लेखणी) लिहित नाही’; म्हणून मला परत दिले. आम्ही ते पेन वापरल्यावर आम्हाला त्या पेनने चांगल्या प्रकारे लिहिता येत होते. आम्ही तशाच प्रकारचे चांगले लिहिणारे नवीन पेन (जे आम्ही वापरत होतो) श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना दिले. २८.७.२०२० या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यांना दिलेले नवीन पेन लिहित नसल्याचे सांगितले.
यापूर्वीही श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ वापरत असलेले लाल रंगाचे पेन लिहित नाही; म्हणून त्यांनी मला दिले आणि दुसरे पेन देण्यास सांगितले; पण प्रत्यक्षात त्यांनी दिलेले पेन आम्ही बरेच दिवस वापरले. यापूर्वीही असे प्रसंग झाले आहेत.
यावरून ‘समष्टी कार्यात अनिष्ट शक्ती विविध प्रकारे कसे अडथळे आणतात ?’, हे लक्षात येते.’
– कु. मृण्मयी गांधी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.७.२०२०)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |