भारताच्या फाळणीला काँग्रेस आणि त्या वेळचे नेतेच उत्तरदायी ! – असदुद्दीन ओवैसी
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि समाजवादी पक्ष यांचे जे लोक इतिहास वाचत नाहीत, त्यांना मी आव्हान देतो. फाळणी मुसलमान किंवा महंमद जिना यांच्यामुळे झाली नाही. काँग्रेस आणि त्या वेळचे नेतेच फाळणीसाठी उत्तरदायी होते, असा दावा एम्.आय.एम्. पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी येथे एका सभेत केले. सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओपी राजभर यांनी ‘महंमद अली जिना यांना भारताचे पहिले पंतप्रधान केले असते, तर फाळणी झालीच नसती’, असे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना ओवैसी यांनी वरील विधान केले.
I challenge people of RSS, BJP & SP who don’t read. Partition didn’t happen due to Muslims but due to Jinnah. At that time,only those Muslims could vote who were influential,nawabs or degree holders. Congress & leaders of that time were responsible for partition: Asaduddin Owaisi pic.twitter.com/5PrFTwGrOv
— ANI UP (@ANINewsUP) November 11, 2021