थकीत वेतन न मिळाल्याने जिल्ह्यातील ३ सहस्रांहून अधिक आशासेविकांनी लसीकरणाशी संबंधित काम बंद केले !
कोल्हापूर – आरोग्य विभागाने आशासेविकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केलेल्या आणि लसीकरण न केलेल्या लोकसंख्येचे सर्वेक्षण, तसेच लसीकरण न केलेल्या नागरिकांचे समुपदेशन यांसह अनेक कामांचे दायित्व सोपवले होते. यासाठी आरोग्य विभागाने आशासेविकांना २०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र वारंवार मागणी करूनही थकीत वेतन न मिळाल्याने जिल्ह्यातील ३ सहस्रांहून अधिक आशासेविकांनी लसीकरणाशी संबंधित काम बंद केले आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहिण्यात आले आहे.