‘आज हिंदुत्वाच्या नावाखाली जे काही चालले आहे, ते हिंदुत्व नाही !’ – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
|
नवी देहली – धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडणे, दंगली करणे आणि दलितांवर अत्याचार करणे, हे हिंदुत्व नसून एका माणसाला दुसर्या माणसाशी जोडणे म्हणजे ‘हिंदुत्व’ आहे. (लव्ह जिहाद, लँड जिहाद, बलपूर्वक धर्मांतर, हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर आक्रमणे, क्षुल्लक कारणांवरून धर्मांधांकडून करण्यात येणार्या दंगली, यांविषयी केजरीवाल का बोलत नाहीत ? देहलीतील दंगलीच्या प्रकरणी त्यांच्याच पक्षाचा ताहिर हुसेन या नगरसेवकाला अटक करण्यात आली, त्याच्या कृत्याचा निषेध केजरीवाल यांनी का केला नाही ?, याविषयी ते का बोलत नाहीत ? – संपादक) आज हिंदुत्वाच्या नावाखाली जे काही चालले आहे, ते हिंदुत्व नाही. हे लोक सामाजिक माध्यमांवर लोकांना घाणेरड्या शिव्या देतात, धमक्या देतात, हे हिंदुत्व नाही, असे विधान देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘टाइम्स नाऊ-नवभारत’ आयोजित संमेलनामध्ये एका प्रश्नाला उत्तर देतांना केले.
Kejriwal: Following Lord Ram’s conduct is true Hindutva https://t.co/OevMIWe658
— TOI Delhi (@TOIDelhi) November 10, 2021
केजरीवाल पुढे म्हणाले की, भगवान श्रीराम हे प्रत्येक हिंदूचे आराध्य दैवत आहेत. माझ्या मते, रामचंद्रांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द, त्यांचे बोलणे, हे माझ्यासाठी हिंदुत्व आहे. प्रभु रामाचे जीवन, प्रेरणा आणि आचरण हेच खरे हिंदुत्व आहे. मला देशातील १३० कोटी लोकांना एकत्र करायचे आहे. मला माणसाला माणसाशी जोडायचे आहे आणि देशाला विकासाच्या मार्गावर न्यायचे आहे. माझा आम आदमी पक्ष खर्या हिंदुत्वाचे अनुसरण करत आहे, असा दावाही केजरीवाल यांनी केला. (हिंदुत्वाचे अनुसरण करण्यासाठी हिंदूंचे, हिंदु धर्माचे, हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण करणे अपेक्षित आहे. काश्मिरी हिंदूंसाठी, बंगालमधील हिंदूंसाठी केजरीवाल यांनी आतापर्यंत काहीच केलेले नाही. त्यामुळे त्यांचे हिंदुत्व हे ढोंगीपणाचे, तसेच राजकीय नाटक आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)