(म्हणे) ‘हिंदुत्वा’चा हिंदु धर्म आणि सनातनी परंपरा यांच्याशी काहीही संबंध नाही !’ – काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह
|
नवी देहली – प्रसारमाध्यमे हिंदुत्वाला हिंदु धर्माशी जोडतात याचे मला दुःख आहे. ‘हिंदुत्वा’चा हिंदु धर्म आणि सनातनी परंपरा यांच्याशी काहीही संबंध नाही, असे विधान काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केले. ते काँग्रेसनेते सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी बोलत होते.
दिग्विजय बोले- हिंदुत्व का हिंदू धर्म से कोई संबंध नहीं, सावरकर धार्मिक व्यक्ति नहीं थे https://t.co/Kzasb0ssVE via @NavbharatTimes
— NBT Hindi News (@NavbharatTimes) November 10, 2021
सावरकर यांनी गायीला माता मानण्यावर उपस्थित केला होता प्रश्न !
|
दिग्विजय सिंह पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गोमांस खाणे चुकीचे मानले नाही. सावरकर हे धार्मिक नव्हते. ‘गायीला ‘माता’ मानण्याची काय आवश्यकता आहे ?’, असे त्यांचे म्हणणे होते. गोमांस खाण्यातही अडचण येऊ नये, असे सावरकरांचे म्हणणे होते. त्यांनी ‘हिंदुत्व’ हा शब्द हिंदु अस्मिता रुजवावी; म्हणून आणला होता आणि त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. रा.स्व. संघाच्या प्रचार यंत्रणेमुळे हे घडले आहे. आता त्यांच्याकडे सामाजिक माध्यमासारखे शस्त्र आहे.