वनस्पती ही ईश्वराची मानवाला मिळालेली दैवी देणगी !
१. वनस्पतीवरील संशोधन
१ अ. वनस्पतींना भावना असतात ! : ‘वनस्पतींना भावना असतात’, असा शोध १८४८ या वर्षी गुस्ताव्ह फेचणार (Gustav Fechner) यांनी लावला. ते म्हणतात, ‘वनस्पतींना संवेदना असतात. त्यांच्या आरोग्यात सुधारणा करायची असेल, तर त्यांच्याशी बोलणे, लक्ष देणे, वृत्ती आणि प्रेम या गोष्टी वाढवणे आवश्यक आहे.’ श्री. जगदीशचंद्र बोस या भारतीय संशोधकाने वनस्पतीविषयी संशोधन केले. त्यांनी वर्ष १९०० मध्ये वनस्पतीच्या विद्युत् लहरींचे मोजमाप करणार्या वेगवेगळ्या कृती आणि उपकरणे यांचा शोध लावला. ‘विद्युत् लहरीच्या एका झटक्याने वनस्पतीचे जीवन संपुष्टात येते’, असे प्रयोगाद्वारे त्यांच्या लक्षात आले. (संदर्भ : बिस्वाल आणि इतर २०१३)
१ आ. वनस्पती त्यांच्या शारीरिक अवयवांशी संपर्क साधतात ! : वर्ष १९६० मध्ये क्लेव्ह बॅकस्टर यांनी संशोधन केले की, वनस्पती त्यांच्या शारीरिक अवयवांशी संपर्क साधतात. ‘फीलोडेन्ड्रान्स’ या वनस्पतीच्या मुळांना पाणी दिल्यानंतर ते पानांपर्यंत कधी पोचते, याचे मोजमाप करतांना त्यांना विद्युत् रोधक (इलेक्ट्रीकल रेझिटन्स) द्वारे हे कळले. ‘पॉलिग्राफ’द्वारे जो प्रतिसाद वनस्पतींमध्ये मिळाला, तसाच प्रतिसाद मनुष्यात थोड्या वेळेला भावनिक प्रकारच्या चेतावणीसारखा होता’, असे आढळले. (संदर्भ : Backster clave primary percephon : Biocommunication with plants, Living foods,and Human cells)
२. वनस्पती विचार करू शकतात का ?
वनस्पती प्रकाशाचा उपयोग प्रकाशसंश्लेषण (Photosyntheis) क्रियेसाठी करतात. सूर्यप्रकाशामुळे हिरव्या रंगाची पाने असलेल्या वनस्पतींमध्ये पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांचा रासायनिक संयोग होऊन त्यात वनस्पतीसाठी लागणारी साखर निर्माण होते. या समवेत ‘वनस्पतीची वाढ कोणत्या दिशेने व्हावी’, हा संकेत त्यातून मिळतो. वनस्पतींना अंधारात आणि उजेडात वेगवेगळ्या जनुकाचा (जीन्स) समुच्चय हवा असतो. पुढे असे आढळले की, हीच जनुके मनुष्याच्या डी.एन्.ए.मध्येसुद्धा असतात. वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतीतील जनुके प्राण्यांमधील पेशीच्या विभागणीच्या वेळी न्युरॉनच्या एक्सनलची वाढ आणि जैविक सुरक्षितता यांसाठी आवश्यक आहेत.
३. वनस्पतीस गंधाचे ज्ञान आहे का ?
प्रथम ‘गंध म्हणजे काय ?’, हे स्पष्ट करावे लागेल. जेव्हा आपण गंध अर्थात् कुठलाही वास घेतो, तेव्हा आपले घ्राणेंद्रिय हे त्यातील वायुरूप होणारे रासायनिक जाणतात. (प्रक्रियेतून कळते) याचे उदा. कच्चे फळ आणि पिकलेले फळ, जर एकत्र ठेवले, तर कच्चे फळ लवकर पिकते; कारण पिकलेल्या फळातून पिकवणारे ‘फेनोमोन’ हे हवेत विरतात. तो गंध कच्चे फळ घेते (जसे आपण श्वास घेतो) आणि त्यामुळे ते पिकते. हे प्रकृतीत घडतच असते. जेव्हा एखादे फळ झाडावर पिकायला लागते. हे हार्मोन (Harmon) ज्याला ‘इथायलीन’ (Ethylene) म्हणतो. ते जर इतर फळाने ‘सेन्स’ (Sense) केले, तर तेही पिकतात. अशा प्रकारे झाडाची सर्वच फळे एकाच वेळेस पिकायला येतात.
४. वनस्पतींमध्येही देवाणघेवाण असते का ?
‘डोजर’ (Dodder) अमरवेल नावाची वनस्पती आहे. ती प्रकाशसंश्लेषण करू शकत नाही. त्यामुळे तिच्या वास्तव्यासाठी तिला इतर वनस्पतींच्या आधारे जगता येते. वासाच्या साहाय्याने ती जवळच्या वनस्पतीचा शोध घेऊन त्यावर पाहुणचार करून जगते. ती इतर वनस्पतीचा शोध कसा घेऊ शकते ? हे निसर्गाचे अद्भुत कार्य आहे. जे कार्य वायूरूप रसायन आहे, ते बाजूच्या वनस्पतीद्वारे हवेत विरते. त्याचा सुगावा या डोजरला लागतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अधिक चविष्ट कोणते, ते तो शोधू शकतो. गहू आणि टोमॅटो असेल, तर तो टोमॅटोला निवडून त्यावर वास्तव्य गाजवेल. (आपण तेव्हा म्हणतो की, त्याचे मागील जन्माचे कर्म राहिले असेल; म्हणून अशाद्वारे तो ती परतफेड करत आहे. येथे डोजर – कर्म देणारा आणि टोमॅटो – कर्म घेणारा आहे.)
५. वनस्पतीच्या ऐकण्याविषयी काय सांगता येईल ?
आपण बरेचदा ऐकले आहे की, शास्त्रीय संगीत लावून वनस्पती खोलीत ठेवल्यास त्या भक्कम वाढतात. तशी त्यांना ऐकण्याची आवश्यकता नाही. आजही जंगलात रहाणारा मनुष्य जंगली श्वापद येत असेल, तर त्याच्या पावलांचा आवाज ओळखून स्वतःला सावध करतो. वनस्पती मूळ जमिनीत रोवून असतात आणि अचल असल्यामुळे धोकादायक संकेत मिळाला, तरी त्यापासून पळून जाऊ शकत नाहीत. चल प्राण्यांना ही एक सुविधा आहे.
६. वनस्पती एकमेकांना संपर्क करू शकतात का ?
मुळाशी जाऊन विचार केला, तर याला उत्तर ‘हो’ आहे. येथे संपर्काची व्याख्या कशी करतो, यावर सर्व अवलंबून आहे. एक वनस्पती दुसर्या वनस्पतीला खुणेने प्रतिसाद देते. इमारती लाकूड ‘मॅपल’ वृक्ष म्हणून ओळखल्या जाणार्या झाडावर किडे लागल्यास ते झाड हवेत ‘फेनोमोन’ म्हणून एक विशिष्ट रसायन सोडते. ते शेजारच्या झाडाकडून घेतल्यानंतर घेणार्या झाडाकडून रसायन निर्माण होते, ते किडीवर आक्रमण करून स्वतःचे रक्षण करते. वास्तविक हा एक संपर्कच आहे.
७. वनस्पतींना स्मरणशक्ती असते का ?
वनस्पतींना वेगवेगळ्या प्रकारची स्मरणशक्ती असते. त्यांच्यामधे अल्पावधीची स्मरणशक्ती, प्रतिकारशक्तीसाठी लागणारी स्मरणशक्ती आणि उत्पादन संबंधांतील स्मरणशक्ती आढळते. स्मरणशक्तीच्या अंतर्गत जी काही क्रिया घडते, उदा. स्मरणशक्ती बनणे (Encoding information), स्मरणशक्ती राखून ठेवणे (storing information) आणि स्मरणशक्तीची पुनरावृत्ती करणे (Retrieving information) हे सर्व वनस्पतीत घडते. ‘वनस्पतीला आठवण आहे’, असे म्हणू शकतो.
‘व्हेनस फ्लाय ट्रॅप’ नावाच्या वनस्पतीला लंब गोलाकार डबीच्या आकाराची पाने असतात. ही पानाकृती डबी उघडी असते, तेव्हा किडे या डबीत जातात. त्यातील असलेल्या कोशास किड्यांचा स्पर्श झाला की, डबी बंद होते. साधारण दोन कोशांचा स्पर्श डबी बंद होण्यास आवश्यक आहे. प्रथम स्पर्श झाला, तर २० सेकंदापर्यंत त्याची आठवण ही वनस्पती ठेवते. त्यापेक्षा अधिक वेळ झाल्यानंतर ही आठवण जाते. ही अल्पावधीतील स्मरणशक्तीची क्रिया विद्युत् शक्तीवर आधारित आहे. ही क्रिया मज्जातंतूंच्या हालचालीसारखी आहे. (संदर्भ : डॅनियल चामोव्हिज)
८. वनस्पतीच्या वेगवेगळ्या अवयवांचा संपर्क
वनस्पतीचे वेगवेगळे अवयव एकमेकांशी संपर्क साधतांना पेशीच्या संदर्भात, शरीरक्रियाविषयी आणि वातावरणाची स्थिती या माहितीची देवाण-घेवाण करतात, उदा. मुळांची वाढ ही वनस्पतीच्या फांदीच्या टोकावर दिलेली खूण आणि संकेत यांवर अवलंबून आहे, तसेच फांदीची वाढ ही काही प्रमाणात मुळांच्या खुणेवर आणि संकेतावर अवलंबून आहे. पाने वनस्पतीच्या फांद्यांच्या टोकांना फुलांचा बहर आणण्यासाठी संकेत देतात. अर्थात् पूर्ण वनस्पतीच मेंदूसारखे कार्य करते.
९. वनस्पतींना स्पर्शज्ञान आहे का ?
वनस्पती बाहेरील प्रेरणा देणार्या वस्तूप्रमाणे प्रतिसाद देतात. संवाद साधल्याने किंवा संगीताने त्यांची वाढ चांगली होते. ‘मायमोसा पुडीका’ (Mimosa pudica) म्हणजेच लाजाळू या वनस्पतीस स्पर्श केल्यावर तिची पाने मिटतात. यावरून ती संवेदनशील असतात.’
(क्रमशः)
– डॉ. अजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.३.२०२०)
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/526761.html