५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ठाणे येथील कु. अगस्त्य अभ्युदय कस्तुरे याची त्याच्या आजीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

• ‘वर्ष २०१७ मध्ये ‘कु. अगस्त्य अभ्युदय कस्तुरे उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५३ टक्के पातळीचा’, असे घोषित करण्यात आले होते. आता त्याची पातळी ५७ टक्के झाली आहे. आता त्याच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे त्याची साधनेत प्रगती होत आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

• ‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ठाणे येथील कु. अगस्त्य अभ्युदय कस्तुरे (वय ११ वर्षे) याची त्याच्या आजीला (सौ. मुक्ता देशपांडे यांना) जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. अगस्त्य अभ्युदय कस्तुरे हा या पिढीतील एक आहे !

(वर्ष २०१७ मध्ये कु. अगस्त्य अभ्युदय कस्तुरे याची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के होती. वर्ष २०२१ मध्ये पातळी ५७ टक्के आहे.)

कु. अगस्त्य कस्तुरे

वय ८ ते १० वर्षे

१. समजूतदार

‘पूर्वीपेक्षा आता अगस्त्यचा समजूतदारपणा वाढला आहे. तो खेळणी, बाहेर फिरणे, खाणे इत्यादी कुठल्याच गोष्टींसाठी हट्ट करत नाही.

सौ. मुक्ता देशपांडे

२. शिकण्याची वृत्ती

एकदा आम्ही सेवाकेंद्रात गेलो होतो. तेथे त्याने साधकांनी फलकावर लिहिलेल्या चुका पाहिल्या आणि त्याविषयी सर्व विचारून घेतले. तो इंग्रजी माध्यमातून शिकत आहे. त्यामुळे त्याला (मराठीत लिहिलेला) फलक नीट वाचता येत नव्हता. त्याने माझ्याकडून सर्व समजून घेतले आणि ‘मी घरी जाऊन असेच लिहिणार’, असे मला म्हणाला. नंतर तो स्वतःच्या चुका आणि स्वभावदोष आठवू लागला. तेव्हा मला त्याची शिकण्याची वृत्ती दिसून आली.

३. एकपाठी

तो एकपाठी आहे. तो एका संस्कारवर्गात जातो. तेथे त्याला शिकवलेले श्लोक आणि स्तोत्रे त्याची लगेच पाठ होतात.

४. आज्ञाधारक

तो पुष्कळ आज्ञाधारक आहे. तो आई-बाबा आणि घरातील मोठ्या माणसांनी सांगितलेले सर्व ऐकतो आणि त्याचे पालन करतो.

५. प्रेमभाव

तो प्रेमळ आहे. कुणाचे दुःख पाहिले की, तो भावुक होतो.

६. ‘मला परात्पर गुरु डॉक्टरांना भेटायची इच्छा आहे’, असे तो अनेकदा बोलून दाखवतो.

७. जिज्ञासा

अ. त्याला भूगोल आणि अवकाशातील ग्रह-तारे या विषयांवरील पुस्तके वाचायला आवडतात. त्यातील माहिती आजोबांकडून जाणून घेतो. या वर्षी त्याची चौकसबुद्धी वाढल्याचे जाणवते.

आ. त्याला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पहायला पुष्कळ आवडतो. तो हा ग्रंथ पहातांना पुष्कळ जिज्ञासेने प्रश्न विचारतो.

८. स्वतःला पालटण्याची तळमळ

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये बालसाधकांची माहिती येते. तो ती माझ्याकडून समजून घेतो आणि ‘मी असा कधी होणार ? त्यासाठी मी काय प्रयत्न करू ?’, असे मला विचारतो. त्यातून त्याची स्वतःला पालटण्याची तळमळ दिसून येते.

९. स्वभावदोष

एकलकोंडेपणा, मनमोकळेपणाचा अभाव

‘हे श्रीकृष्णा, तूच अगस्त्यवर तुला अपेक्षित असे संस्कार आमच्याकडून करवून घे’, अशी भावपूर्ण प्रार्थना करते.

– सौ. मुक्ता देशपांडे (कु. अगस्त्यची आजी – आईची आई), कोलशेत, ठाणे. (५.३.२०२०)


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.


• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक