साधनेत मनमोकळेपणाने बोलणे आणि मनातील विचारांना योग्य दिशा देणे महत्त्वाचे ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
रामनाथी (गोवा) – युवा साधना शिबिरात तुम्हाला सहभागी व्हायला मिळणे, हे भगवंताचेच नियोजन आहे. साधकांमध्ये तळमळ असल्यास त्यांना या शिबिराचा १०० टक्के लाभ होणार आहे. सतत शिकण्याच्या स्थितीत राहिल्याने सहजता येते. साधकांनी शिबिरात मोकळेपणाने बोलायला हवे. बोलतांना चुकलो तरी चालेल; पण न बोलण्याची चूक करायला नको. साधनेत मनमोकळेपणाने बोलणे आणि मनातील विचारांना योग्य दिशा देणे महत्त्वाचे असते. त्यामुळे उत्तरदायी साधकांना मनातील शंका आणि विचार सांगून त्यांवर मार्गदर्शन घ्यायला हवे, असे मार्गदर्शन सनातनच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केले.
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चालू असलेल्या ‘युवा साधना शिबिरा’त मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. या वेळी शिबिरार्थिंनी उत्स्फूर्तपणे त्यांना स्वत:च्या साधनेत येणार्या अडचणी, शंका आणि शिबिरात शिकायला मिळालेली सूत्रे कथन केली.
क्षणचित्र
या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी ‘मनात नकारात्मक विचार आल्यावर त्यांतून बाहेर पडण्यासाठी कसे प्रयत्न करावेत ?’, याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी प्रार्थना सांगितली. तेव्हा उपस्थित काही साधकांना दैवी सुगंध येत असल्याचे, तसेच वातावरणातील चैतन्य वाढल्याचे जाणवले. काही साधकांना वातावरणात गारवा जाणवला, तर काहींना हलके वाटून शांतता जाणवली. काही साधकांना सभागृह प्रकाशमान झाल्याचे जाणवले.