इस्लामाबाद (पाकिस्तान) येथील मंदिरासाठी भूमी देण्याला पुन्हा मिळाली अनुमती
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकची राजधानी इस्लामाबादमध्ये बांधण्यात येणार्या पहिल्या हिंदु मंदिरासाठी भूमी देण्याला पुन्हा अनुमती मिळाली आहे. या भूमीवर मंदिर, स्मशान आणि सामुदायिक केंद्र बांधण्यात येणार आहे.
Four kanals (0.5 acres) of land was allotted to the community in 2016 for the construction of the first-ever Hindu temple, cremation and community centrehttps://t.co/PzCwm6fV9t
— WION (@WIONews) November 10, 2021
सर्वप्रथम वर्ष २०१६ मध्ये ही अनुमती देण्यात आली होती. तथापि सदर भूमीवर मंदिराचे बांधकाम चालू न झाल्याचे कारण देत ही अनुमती मागे घेण्यात आली. आता ‘राजधानी विकास प्राधिकरणा’ने तिला पुन्हा अनुमती दिली. या प्रकरणी प्राधिकारणाचे प्रवक्ता सैयद आसिफ रजा यांनी सांगितले की, गैरसमजातून ही अनुमती रहित करण्यात आली होती.