मुख्यमंत्री असतांना देवेंद्र फडणवीस यांनी गुंडांना मोठ्या पदावर बसवले ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांकमंत्री
मुंबई – देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतांना त्यांनी हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादव याला ‘बांधकाम कामगार मंडळा’चे अध्यक्ष केले. बांगलादेशी नागरिकांना मुंबईत वसवण्याचे काम करणार्या हैदर आझम याच्या पत्नीवर गुन्हा नोंदवला जात असतांना देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून पोलिसांना दूरभाष करून हस्तक्षेप करण्यात आला, असे आरोप १० नोव्हेंबर या दिवशी अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केले.
Nawab Malik on Devendra Fadnavis : मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब बनावट नोटांवर आदळला; बनावट नोटांच्या रॅकेटला फडणवीस सरकारची सुरक्षा: नवाब मलिक#NawabMallik#DevendraFadnavis#BJP #NCP https://t.co/2mLe9zlbhn
— Timesnowmarathi (@timesnowmarathi) November 10, 2021
८ ऑक्टोबर २०१७ या दिवशी पोलिसांनी मुंबईतील ‘बीकेसी’ येथे धाड टाकून १४ कोटी ५६ लाख रुपयांच्या बनावट नोट्या पकडल्या. हे प्रकरण तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दाबले, असाही आरोप मलिक यांनी केला.