हिंदूंनो, चित्रपट आणि मालिका यांत देवी-देवता म्हणून अभिनय करणार्यांची पूजा करू नका !
‘हिंदूंनी दूरदर्शनवरील मालिका किंवा चित्रपट यांमध्ये देवी-देवतांचा अभिनय करणार्या अभिनेत्यांच्या चित्रांची देवाच्या रूपात पूजा करू नये. लक्षात ठेवा, ते फक्त अभिनेते आहेत. आज ते देवी-देवता म्हणून काम करतील, उद्या कुणी अधिक पैसे दिले, तर ते कोणत्या तरी दुष्ट व्यक्तीचे पात्र साकारतील ! किती अभिनेते मद्याच्या नशेत वावरतात, काही तर चारित्र्यहीन आणि देशद्रोही असतात; म्हणून जे देवतेचा अभिनय करतात, ते पूजन करण्यायोग्य नसतात. ज्यांची उक्ती आणि कृती धर्म अन् शास्त्र यांनुसार आहे, त्यांचे जीवन आदर्श आहे. तेच पूज्य आहेत, यासाठी विवेकबुद्धीचा वापर करावा. वर्ष २०१३ च्या महाकुंभमेळ्यात सीता-राम, शिव-पार्वती इत्यादी धार्मिक मालिकांमध्ये देवता म्हणून काम करणार्या अभिनेते-अभिनेत्रींची छायाचित्रे विक्रेत्यांनी भाविकांना मूर्ख बनवून विकली होती. हिंदूंनो, तुमचा विवेक वापरून धर्माचरण करा !’
– पू. तनुजा ठाकूर (६.११.२०२१)