सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसर्‍या दिवशीही एस्.टी.ची सेवा ठप्प

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एस्.टी.च्या सर्व आगारातील कामगार सहभागी झाल्यामुळे जिल्ह्यातील एस्.टी.ची वाहतूक ठप्प झाली आहे.

सिंधुदुर्ग – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (एस्.टी.चे) राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यात एस्.टी.च्या कर्मचार्‍यांनी ८ नोव्हेंबरपासून संप चालू केला आहे. या संपात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एस्.टी.च्या सर्व आगारातील कामगार सहभागी झाल्यामुळे जिल्ह्यातील एस्.टी.ची वाहतूक ठप्प झाली आहे. ९ नोव्हेंबर या संपाच्या दुसर्‍या दिवशी कामगारांनी ‘आमच्यावर कारवाई झाली तरी चालेल; मात्र मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार’, अशी भूमिका घेत आंदोलन चालूच ठेवले आहे.

जिल्ह्यातील बहुतांश सर्व आगारातील चालक, वाहक आणि अन्य कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.