तळवडे येथील ‘बँक ऑफ इंडिया’च्या ‘ए.टी.एम्.’मधील रक्कम चोरण्याचा प्रयत्न अयशस्वी !
(ए.टी.एम्. अर्थात् ‘बँकेच्या खात्यातून पैसे कधीही काढू शकतो’, असे यंत्र)
सावंतवाडी – ‘बँक ऑफ इंडिया’ या अधिकोषाचे तालुक्यातील तळवडे येथील ‘ए.टी.एम्.’ यंत्र अज्ञाताने फोडल्याचे ९ नोव्हेंबरला सकाळी उघड झाले. याविषयी स्थानिकांनी अधिकोषाच्या अधिकार्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी येऊन पहाणी केली. त्यानंतर सावंतवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देण्यात आली. प्रथमदर्शनी चोरांनी यंत्रातील रोख रक्कम चोरल्याचे बोलले जात होते; मात्र पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असता चोरांना यंत्रातील रोख रक्कम काढण्यात अपयश आल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.