देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे कोल्हापूरला महापुराचा फटका ! – मेधा पाटकर
कोल्हापूर – कर्नाटकातील आलमट्टी धरणाची उंचीच नव्हे, तर धरणाच्या पाठीमागे असलेल्या पाण्याचा फटकाही कोल्हापूरला महापुरात बसतो. नदीच्या प्रवाहातील अडथळे या पुरासाठी कारणीभूत आहेत. विज्ञानाचा आधार न घेता बांधकाम व्यावसायिकांनी आखलेली पंचगंगेची पूररेषा तत्कालीन फडणवीस सरकारने मान्य केली. त्याचे परिणाम कोल्हापुरातील जुन्या वस्त्यांनाही भोगावे लागले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे कोल्हापूरला महापुराचा फटका बसला, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला. ‘कोल्हापूर प्रेस क्लब’च्या वतीने आयोजित वार्तालापात त्या बोलत होत्या.
‘प्रेस क्लब’चे अध्यक्ष मोहन मेस्त्री यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी ‘सकाळ’चे निवासी संपादक निखिल पंडितराव, पर्यावरणतज्ञ उदय गायकवाड, वनस्पतीतज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर उपस्थित होते.