‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या इंग्लंड येथील साधिका कु. ॲलिस स्वेरदा यांनी ‘नवनरसिंह यागा’च्या वेळी सूक्ष्मातून दिसल्याप्रमाणे काढलेली चित्रे !
‘काही कालावधीपूर्वी रामनाथी (गोवा) येथे ‘नवनरसिंह याग’ झाला. त्या वेळी यज्ञाच्या वेळी मला सूक्ष्मातून नृसिंहाने विविध रूपांत दर्शन दिले. त्याप्रमाणे काढलेली चित्रे आणि मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. नृसिंहाने श्रीविष्णुचे तारक रूप धारण केले असल्याचे दृश्य दिसल्यानंतर स्फुरलेले काव्य
हे श्रीविष्णु, तुझ्या हास्याने ‘जीवनाचे सार्थक’ झाल्याचे समाधान होते ।
हे श्रीविष्णु,
तुझ्या एका दृष्टीक्षेपाने आमचे हृदयमंदिर भरून जाते ।
तुझ्या चैतन्याने आमचे मन निर्मळ होते ।
तुझे हास्य पाहून ‘जीवनाचे सार्थक’ झाल्याचे समाधान होते ।। १ ।।
आम्हा साधकांच्या हृदयाची धडधड तुझ्यासाठीच आहे ।
नामस्मरणाची गुंज तुझ्यासाठीच आहे ।
तुझ्या अवतारी कार्यातील आमचा एकत्रित सेवारूपी सहभागही,
केवळ अन् केवळ तुझ्यासाठीच आहे ।। २ ।।
२. ‘नृसिंह सार्या विश्वाची देवता आहे, नृसिंह म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, असे जाणवणे
मी नृसिंहाचे हे रूप पाहिले, तेव्हा मला ‘त्याने स्वतःचा शेला प्रेमाने पृथ्वीभोवती आच्छादला आहे. त्याचा निळ्या रंगातील कटीशेला (कंबरशेला) म्हणजे पृथ्वीवरील समुद्र असून त्याचे पितांबर म्हणजे पृथ्वीचा भूभाग आहे. तो सर्वकाही आहे आणि विश्वातील प्रत्येक गोष्टीत तो व्यापलेला आहे’, असे मला जाणवले. आई जशी बाळाला प्रेमाने आपल्या कवेत घेते, त्याप्रमाणे नृसिंहाने पृथ्वीला प्रेमाने आपल्या कवेत घेतले आहे. नृसिंह सार्या विश्वाची देवता आहे, नृसिंह म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत !
३. नृसिंह आणि गरूड यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे
अ. नृसिंहाने गरूडाला प्रेमाने घट्ट पकडले होते.
आ. नृसिंहाच्या या रूपात तारक शक्ती जाणवली.
इ. मला हे दृश्य दिसल्यावर कुणीतरी मधुर स्वरात ‘श्री विष्णवे नमः ।’ हा नामजप करत असल्याचे ऐकू आले.
ई. श्रीविष्णु आणि गरूड हे कधीच विभक्त होऊ शकत नाहीत. श्रीविष्णु जेव्हा जेव्हा अवतार धारण करतो, तेव्हा तेव्हा प्रत्येक अवताराच्या वेळी गरूड श्रीविष्णुचे संरक्षण आणि त्याची सेवा करण्यासाठी त्याच्या समवेत असतो.
उ. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या वर, तसेच आश्रमाच्या सभोवताली अनेक गरूड घिरट्या घालत होते. मधे मधे ते मोठ्या संख्येने येत होते आणि संघटितपणे घिरट्या घालत होते. यातून ‘परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या रक्षणासाठी आम्ही सदैव आहोत’, असे ते सांगत आहेत’, असे मला जाणवले.’
– कु. ॲलिस स्वेरदा, इंग्लंड (१९.५.२०२१)
|