खंडणी प्रकरणी आणखी दोन पोलीस अधिकारी अटकेत !
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी खंडणी वसुली केल्याचे प्रकरण
मुंबई – विकासक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात खंडणी वसुलीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याच प्रकरणात मुंबई पोलीस दलातील अधिकारी नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (‘सीआयडी’चे) अधीक्षक मारुति जगताप यांनी दिली.
गुन्हा मागे घेण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंह यांच्यासह उपायुक्त अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पोलीस निरीक्षक आशा कोकरे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्यावर आहे.