पुणे येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. संगीता दराडे यांना आलेल्या अनुभूती
१. गुरुलीला सत्संगामध्ये ‘भगवंतच बोलत आहे’, असे वाटून सर्व सूत्रे अंतर्मनापर्यंत पोचत असणे
‘परात्पर गुरुमाऊलींच्या कृपेने ‘गुरुलीला सत्संग’ (साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली होण्यासाठी ऑनलाईन घेण्यात येणारा सत्संग) चालू झाल्यापासून माझा नामजप पूर्ण होतो. पूर्वी सेवा करतांना मला परात्पर गुरुमाऊलींचे स्मरण व्हायचे; परंतु आता घरातही त्यांचे स्मरण होते. सत्संगात ‘सौ. मनीषा पाठक बोलत नसून भगवंतच बोलत आहे’, असे जाणवून सर्व सूत्रे अंतर्मनापर्यंत पोचतात. मी काहीही प्रयत्न न करता असा भाव आपोआपच निर्माण होत असल्याने पुष्कळ कृतज्ञता वाटते.
२. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने यजमानांची व्यसने सुटणे
पूर्वी माझ्या यजमानांना व्यसने होती. गेल्या दोन मासांत परात्पर गुरुदेवांच्या कृपेने यजमानांना स्वतःवर नियंत्रण मिळवता येते. आता त्यांची सर्व व्यसने बंद झाली आहेत. परात्पर गुरुदेवांनीच त्यांच्यात पालट केला आहे. यासाठी कृतज्ञता !’
– सौ. संगीता दराडे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सिंहगड रस्ता, पुणे. (३.४.२०२१))
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |