चंद्रपूर येथे बस कर्मचार्‍याची विष प्राशन करून आत्महत्या !

सत्यजित ठाकूर

चंद्रपूर – राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी १३ दिवसांपासून महामंडळातील चालक, वाहक आणि इतर कर्मचारी यांनी ‘काम बंद’ आंदोलन चालू केले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख आगारांमध्ये वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत असलेले सत्यजित ठाकूर (वय ३४ वर्षे) या कर्मचार्‍याने ८ नोव्हेंबर या दिवशी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. त्यामुळे बस कर्मचारी संतप्त झाले आहेत.

सत्यजित यांची पत्नी स्वतःच्या ४ मासांच्या मुलीसमवेत नागपूर येथे रहाते.