दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या नावे सक्षम महिला सरपंचांना पुरस्कार देणार ! – ग्रामविकास राज्यमंत्री सत्तार
संभाजीनगर – गावाच्या विकासासाठी विविध योजना आणि संकल्पना प्रभावीपणे राबवणार्या राज्यातील ५ महिला सरपंचांना ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने प्रतिवर्षी दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा ग्रामविकास आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ८ नोव्हेंबर या दिवशी येथे केली. ‘येत्या ६ मासांत राज्य, विभाग आणि जिल्हास्तर येथे हे पुरस्कार दिले जातील. मूल्यमापन समितीच्या माध्यमातून त्यांची निवड केली जाईल’, असेही त्यांनी सांगितले. येथे आयोजित केलेल्या ‘महिला सरपंच परिषदे’त ते बोलत होते.
राज्यमंत्री सत्तार पुढे म्हणाले की, आपल्याकडे ५० टक्के महिला सरपंच आहेत. विकासाचे ‘व्हिजन’ (दृष्टी) महिलांकडे आहे. त्यांना संधी मिळायला हवी. विकासकामे करतांना अडचणी येत असतील, तर त्या सरकारला सांगा.