चीन पाकिस्तानला देणार ४ अत्याधुनिक युद्धनौका
|
बीजिंग (चीन) – चीन अत्याधुनिक ‘टाईप ०५४’ युद्धनौका पाकिस्तानला देणार आहे. पुढील ३ वर्षांत चीन पाकला आणखी ३ युद्धनौका देणार आहे. याआधी चीनने पाकला ‘जेएफ्-१७ हे चौथ्या श्रेणीतील लढाऊ विमान विकसित करण्यास साहाय्य केले होते. जेएफ्-१७ हे पाकिस्तानच्या वायूदलाचे महत्त्वाचे लढाऊ विमान आहे.
‘टाईप ०५४’ ही अनुमाने ४ सहस्र टन वजनाची युद्धनौका जगातील अत्याधुनिक युद्धनौकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. रडारवर पटकन शोधता येणार नाही, अशी या युद्धनौकेची रचना आहे. भूमीवर आणि हवेमध्ये विविध प्रकारची क्षेपणास्त्रे डागण्याची या युद्धनौकेची क्षमता असून पाणबुडीविरोधी कारवाईतही ही युद्धनौका उत्कृष्ट समजली जाते. अशा २५ पेक्षा अधिक युद्धनौका चीनच्या नौदलात कार्यरत आहेत.
China State Shipbuilding Corporation Limited (CSSC) while handing over the warship to the Pakistan Navy said it is the ‘largest and most advanced warship ever exported’https://t.co/PiC73jTNy0
— WION (@WIONews) November 9, 2021