आतंकवादी दाऊद याची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही ! – सनातन संस्था
मुंबई – मुंबईतील अमली पदार्थाच्या प्रकरणात अत्यंत हीन पातळीचे राजकारण चालू आहे. त्यातच आज नवाब मलिक यांनी स्वतःवर झालेल्या आरोपांच्या खुलाशासाठी सत्य जाणून न घेताच सनातन संस्थेच्या नावाचा विनाकारण वापर केला आहे. कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम याची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही. प्रत्यक्षात रत्नागिरीतील वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार ती मालमत्ता देहलीतील अधिवक्ता अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केली आहे. त्या ठिकाणी लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी ‘सनातन धर्म पाठशाळा’ नावाने गुरुकुल चालू करण्याचे त्यांनी घोषित केले आहे. सनातन संस्था आणि अधिवक्ता अजय श्रीवास्तव यांचा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.
तसेच ‘पुरेशी माहिती न घेताच सनातन संस्थेच्या संदर्भात अशा प्रकारचे खोटे आरोप करून नवाब मलिक यांनी स्वतःचे हसे करून घेऊ नये. त्यांचा हा प्रकार म्हणजे समाजात हिंदु संस्थांविषयी अपसमज पसरवण्याची ही दुष्ट बुद्धी आहे. या प्रकरणी नवाब मलिक यांना महाराष्ट्र सरकारने समज द्यावी, अशी अपेक्षा आहे’, असे आवाहन श्री. राजहंस यांनी केले आहे.
…अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल !
श्री. चेतन राजहंस यांनी पुढे म्हटले आहे की, नवाब मलिक यांनी सनातन संस्थेचे नाव घेऊन महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात त्यांच्यावर आतंकवादाच्या गुन्हेगारांकडून थेट भूमी घेतल्याचा आरोप झाला आहे, तसेच नवाब मलिक ज्या दाऊदच्या भूमीचा उल्लेख करत आहेत, ती भूमी केंद्र सरकारने जप्त करून लिलाव केलेली आहे. त्यामुळे अधिवक्ता श्रीवास्तव यांनीही ती दाऊदकडून घेतलेली नसून सरकारी लिलावाच्या माध्यमातून खरेदी केलेली आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
दाऊद से संबंधित कोई भी संपत्ति सनातन संस्था ने नहीं खरीदी है । @nawabmalikncp ने स्वयं पर किए गए आरोपों के खुलासे के लिए सत्य न जानते हुए सनातन संस्था के नाम का अनुचित उपयोग किया है । – @1chetanrajhans, प्रवक्ता, @SanatanSanstha
@NavbharatTimes @Republic_Bharat @TimesNow pic.twitter.com/EeXP2U4EVM
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) November 9, 2021
त्यामुळे असत्य माहितीच्या आधारे स्वतःची लंगडी बाजू सावरण्याचा त्यांचा प्रयत्न उघडा पडला आहे. या संदर्भात सनातन संस्थेविषयी असत्य माहिती पसरवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविषयी नाईलाजाने आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल, अशी चेतावणी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे आम्ही देत आहोत.